Logo
Latest Blog

IVF मधील LIT थेरपी – प्रक्रिया, फायदे आणि परिणाम

Explore expert insights to inspire, guide, and support you through every step of your parenthood journey with confidence.

SHARE:

या ब्लॉगमध्ये आपण LIT थेरपीबद्दल सविस्तर जाणून घेऊया. याची प्रकिया, फायदे आणि परिणाम – याविषयी सोप्या शब्दांत, माहिती घेऊया. चला, ब्लॉगची सुरुवात करूया!

IVF म्हणजे काय? 

प्रथम, IVF ची थोडी ओळख करून घेऊया. IVF ही एक आधुनिक फर्टिलिटी ट्रीटमेंट आहे, ज्यात महिलेच्या शरीरातील स्त्रीबीज शरीराबाहेर काढून त्याचे स्पर्मसोबत फर्टिलायझेशन घडवले जाते आणि एम्ब्रियो (गर्भ) तयार केला जातो. नंतर हा एम्ब्रियो महिलेच्या गर्भाशयात सोडला जातो. ही सर्व प्रक्रिया लॅब मध्येच घडवून आणली जाते. ट्यूब ब्लॉकेज, कमी स्पर्म काउंट किंवा वय अधिक असणे अशा काही गुंतागुंतीच्या फर्टिलिटी समस्या असल्यास IVF ची मदत होते. जगभरात लाखो जोडप्यांना IVF मुळे आई-��ाबा होणं शक्य झालं आहे.

LIT थेरपी म्हणजे काय?

LIT थेरपी ही एक इम्युन थेरपी आहे, जी IVF मधील इम्युन समस्या सोडवते. याचे पूर्ण नाव Lymphocyte Immunization Therapy (लिम्फोसाइट इम्युनायझेशन थेरपी). लिम्फोसाइट म्हणजे रक्तातील एक प्रकारचे सेल्स, जी इम्युन सिस्टमचा भाग असतात. ही थेरपी पतीच्या रक्तातील या सेल्स वापरून पत्नीच्या शरीरात इंजेक्शन देते. 

असं का करतात? 

काही महिलांच्या शरीरात NK सेल्स (नॅचरल किलर सेल्स) जास्त असतात. हे सेल्स बाळाच्या विकासात अडथळा आणतात. LIT ने शरीर ब्लॉकिंग अँटिबॉडीज (BA) तयार करण्यास मदत करते. ही अँटिबॉडीज बाळाला संरक्षण देतात आणि गर्भपात रोखतात. ही थेरपी स्त्रीच्या शरीरात इम्युन सिस्टिम आणि गर्भधारणेसाठी आवश्यक असलेली सहनशीलता (Tolerance) निर्माण करण्यासाठी केली जाते.

थोड्या वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर –

जेव्हा एखाद्या स्त्रीचं शरीर पार्टनरच्या स्पर्ममधील जनुकांना "परकीय" समजून त्यांच्यावर हल्ला करतं किंवा गर्भधारणेला "शत्रू" समजतं, तेव्हा प्रेग्नन्सी होत नाही किंवा झाली तरी टिकत नाही. LIT थेरपीमध्ये पार्टनरच्या ब्लडमधून काढलेले लिम्फोसाइट्स स्त्रीच्या शरीरात इंजेक्ट केले जातात, ज्यामुळे तिचं शरीर त्या पेशींना "आपलं" समजायला लागतं. यामुळे गर्भधारणेला अडथळा येत नाही.

हे देखील वाचा: IUI failure होण्याची कारणे आणि अयशस्वी IUI नंतर यशस्वी ...

IVF मध्ये LIT थेरपीची भूमिका

IVF प्रक्रियेत अनेक वेळा तांत्रिकदृष्ट्या सर्व काही बरोबर असतं – एम्ब्रियो चांगल्या क्वालिटीचा असतो, गर्भाशय व्यवस्थित असतं – तरीही इम्प्लांटेशन होत नाही. अशावेळी समस्या बहुतांश वेळा इम्युन सिस्टिमशी संबंधित असते.

IVF प्रक्रियेमध्ये LIT थेरपी खालील परिस्थितीत महत्त्वाची ठरते:

- वारंवार इम्प्लांटेशन फेल्युअर होत असल्यास

- दोन किंवा अधिक वेळा गर्भपात झाल्यास

- सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असूनही प्रेग्नन्सी न होत असल्यास

- स्त्रीच्या इम्युन सिस्टिममध्ये अडथळे असतील तर

- शरीरात स्पर्मविरोधी अँटीबॉडीज तयार झाल्या असतील तर

ही थेरपी गर्भाशयाला "एम्ब्रियो स्वीकारण्यासाठी" तयार करते आणि इम्युन सिस्टिमला सहकार्य करायला शिकवते.

हे देखील वाचा: वारंवार गर्भपात अनुभवताय? जाणून घ्या गर्भधारणेसाठी उपचार

LIT थेरपीची प्रक्रिया – स्टेप बाय स्टेप

LIT थेरपी साधारणपणे IVF सायकलच्या आधी केली जाते. ही थेरपी प्रत्येकी ३०-४५ मिनिटांच्या दोन ते चार सेशन्स मध्ये केली जाते. ज्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे असते: 

1. टेस्टिंग आणि तयारी

- प्रथम, महिलेच्या रक्ताची तपासणी केली जाते. यात LAD टेस्ट (ल्यूकोसाइट अँटिबॉडी डिटेक्शन) असते. जर BA (ब्लॉकिंग अँटिबॉडीज) कमी असेल, तर LIT ची गरज असते.

- पतीचे रक्त घेतले जाते. हे रक्त सॅनिटायझ केले जाते आणि लिम्फोसाइट्स वेगळे केले जातात. यासाठी सेंट्रीफ्यूज मशीन वापरली जाते, जी रक्ताचे लेयर्स वेगळे करते.

2. सेल्स तयार करणे

- वेगळ झालेल्या लिम्फोसाइट्सना सॅलाइन (सोडियम क्लोराइड सोल्यूशन) मध्ये मिसळले जाते. यात प्रोटीन्स आणि अँटिजेन्स असतात, जी इम्युन सिस्टमला मदत करतात.

- जर डोनर स्पर्म वापरत असाल, तर डोनरचे सेल्स घेतले जातात.

3. इंजेक्शन

लिम्फोसाइट्स स्त्रीच्या स्किनखाली (subcutaneous) इंजेक्शनद्वारे दिले जातात. इंजेक्शन सामान्यतः हाताच्या त्वचेवर दिले जाते.

३-४ आठवड्यांच्या अंतराने सामान्यतः २ सेशन्स असतात. प्रत्येक सेशन १५-२० मिनिटांचे असते.

4. वेटिंग पीरियड 

थेरपीनंतर काही आठवड्यांमध्ये (साधारण 4 आठवडे) स्त्रीच्या शरीरात इम्युनोलॉजिकल "टॉलरन्स" तयार होतो, म्हणजेच ती पार्टनरच्या पेशींना स्वीकारायला शिकते व शरीराची इम्युन प्रतिक्रिया विकसित होते.

5. IVF सायकल सुरू करणे

LIT थेरपी पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर IVF प्रक्रिया सुरू करतात. यामुळे इम्प्लांटेशन आणि गर्भधारणेची शक्यता वाढते.

ही प्रक्रिया क्लिनिकमध्ये होते आणि यासाठी साधारण ५०,००० ते १ लाख रुपये प्रति कोर्स इतका खर्च येऊ शकतो. असे असले तरीही, थेरपी मुळे IVF चे सायकल्स कमी होऊ शकतात, म्हणजेच IVF चा एकूण खर्च कमी होऊ शकतो.

हे देखील वाचा: हिस्टेरोस्कोपी (Hysteroscopy) म्हणजे काय? कारणे आणि फायदे

LIT थेरपीचे फायदे (Benefits)

LIT थेरपीचे अनेक फायदे आहेत आणि म्हणूनच ती आज IVF मध्ये एक लोकप्रिय सहाय्यक थेरपी बनली आहे:

1. इम्प्लांटेशनची शक्यता वाढवते

LIT थेरपीमुळे गर्भाशय एम्ब्रियो स्वीकारायला तयार होतं आणि इम्प्लांटेशन यशस्वी होण्याची शक्यता वाढते.

2. मिसकॅरेजचा धोका कमी करते

जे कपल्स वारंवार गर्भपात अनुभवतात, त्यांच्यासाठी ही थेरपी फायदेशीर ठरते. इम्युन सिस्टिम एम्ब्रियोला परकीय न समजल्यामुळे गर्भ टिकण्याची शक्यता वाढते.

3. नैसर्गिक प्रेग्नन्सीची शक्यता वाढवते

काही वेळा LIT थेरपी घेतल्यानंतर कपल्सना IVF शिवायही नैसर्गिक गर्भधारणा मिळते.

4. IVF सायकलचा यशदर वाढतो

संपूर्ण IVF प्रक्रियेचा यशदर वाढवण्यासाठी LIT थेरपी मोठी भूमिका बजावते, विशेषतः ‘unexplained infertility’ असलेल्या जोडप्यांमध्ये.

5. सुरक्षित आणि कमी साइड इफेक्ट्स असलेली प्रक्रिया

योग्य मार्गदर्शनाखाली आणि अनुभवी डॉक्टरांच्या हाताखाली केली गेल्यास ही प्रक्रिया तुलनेने सुरक्षित आणि कमी रिस्क असलेली असते.

हे देखील वाचा: Menopause info in Marathi | मेनोपॉज लक्षणे,कारणे,आणि उपचार

LIT थेरपीचे साइड इफेक्ट्स

LIT थेरपी सुरक्षित मानली जात असली तरीही काही साइड इफेक्ट्स संभवतात. ते पुढीलप्रमाणे –

1. हलकी सूज, लालसरपणा

इंजेक्शनच्या जागी हलकी सूज, लालसरपणा किंवा खाज येऊ शकते. हे काही दिवसात आपोआप कमी होते.

2. अलर्जिक रिअॅक्शन

क्वचितच काही महिलांमध्ये अलर्जिक रिअॅक्शन दिसून येते. त्यामुळे थेरपीपूर्वी एलर्जी हिस्ट्री सांगणे गरजेचे आहे.

3. इन्फेक्शनचा धोका

क्वचितच, पण ब्लड पेशींमुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे सेंटरने सर्व सेफ्टी प्रोटोकॉल्स फॉलो केलेले असणे आवश्यक आहे.

4. कार्यक्षमता प्रत्येकासाठी सारखी नसते

प्रत्येक रुग्णामध्ये थेरपीचा परिणाम वेगवेगळा असू शकतो. काहींना त्वरित फायदा होतो तर काहींना थोडा वेळ लागतो.

धोके टाळण्यासाठी: नेहमी सर्टिफाइड क्लिनिक निवडा, डॉक्टरांच्या सल्ल्याने करा आणि फॉलो-अप घ्या.

हे देखील वाचा: फॅलोपीअन ट्यूब म्हणजे काय? याचे कार्य आणि अडथळ्याचे परिणाम

LIT थेरपीचे परिणाम आणि यशाचे प्रमाण

• LIT थेरपीमुळे IVF चा यशदर साधारण 15-25% ने वाढतो, विशेषतः वारंवार इम्प्लांटेशन फेल्युअर  होत असलेल्या जोडप्यांमध्ये हे अधिक पाहायला मिळतं. 

• संशोधनानुसार, वारंवार गर्भपात होत असलेल्या स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी टिकण्याचे प्रमाण वाढते

• इम्प्लांटेशन रेट वाढतो.

• Live birth rate (बाळ जन्माची शक्यता) सुधारते.

लक्षात ठेवा की परिणाम व्यक्तिनिहाय बदलतात आणि थेरपी यशस्वी होण्यासाठी इतर घटक जसे की वय, स्त्रीबीजांची गुणवत्ता, शुक्राणूंची गुणवत्ता, गर्भाशयाची स्थिती हे सर्व देखील महत्त्वाचे असतात.

हे देखील वाचा: एग फ्रीजिंग: खर्च, यश आणि काळजी बाबत संपूर्ण माहिती

थेरपीपूर्वी घ्यायची काळजी

LIT थेरपी घेण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे:

• संपूर्ण मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांशी शेअर करा

• एलर्जी, क्रॉ���िक आजार किंवा इम्युन सिस्टिमशी संबंधित समस्या असल्यास त्याबद्दल माहिती द्या

• सर्व सुविधांनी परिपूर्ण, अनुभवी आणि प्रमाणित फर्टिलिटी सेंटरची निवड करा

• थेरपीपूर्वी सर्व ब्लड टेस्ट आणि स्क्रीनिंग पूर्ण करा

• डॉक्टरांच्या सूचना पाळा आणि थेरपीदरम्यान फॉलो-अप घ्यायला विसरू नका

हे देखील वाचा: इनसेमिनेशन म्हणजे काय?(Insemination in Marathi)

योग्य सेंटर आणि डॉक्टर निवडताना काय बघावे?

LIT थेरपी यशस्वी होण्यासाठी योग्य सेंटर आणि अनुभवी डॉक्टरांची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. निवड करताना पुढील गोष्टींकडे लक्ष द्या:

- सेंटरकडे LIT थेरपी करण्याचा पुरेसा अनुभव आहे का

- ब्लड प्रोसेसिंग आणि इंजेक्शनसाठी स्टँडर्ड सेफ्टी प्रोटोकॉल्स फॉलो केले जातात का

- डॉक्टर इम्युनोलॉजिकल कारणे समजून सल्ला देतात का

- पूर्वीच्या रुग्णांचे रिव्ह्यू आणि सक्सेस स्टोरीज तपासा

----------------

निष्कर्ष -

LIT थेरपी ही IVF मधील एक महत्त्वाची आणि परिणामकारक सहाय्यक थेरपी आहे, विशेषतः त्या कपल्ससाठी ज्यांना वारंवार इम्प्लांटेशन फेल्युअर किंवा मिसकॅरेजचा सामना करावा लागतो. ही थेरपी इम्युन सिस्टिमला गर्भधारणेशी "मैत्री" करायला शिकवते आणि प्रेग्नन्सी टिकवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढवते.

ही थेरपी प्रत्येकासाठी आवश्यक नसते आणि तिचा निर्णय नेहमीच अनुभवी IVF स्पेशॅलिस्टच्या सल्ल्यानेच घ्यावा. योग्य सल्ला, योग्य वेळ आणि योग्य मार्गदर्शनाने LIT थेरपी तुमच्या पालकत्वाच्या स्वप्नाला वास्तवात आणण्यात मदत करू शकते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

1. LIT थेरपी म्हणजे काय?

– LIT थेरपी ही इम्यून सिस्टीम मजबूत करण्यासाठी दिली जाणारी एक स्पेशल इम्यूनोलॉजिकल ट्रीटमेंट आहे जी गर्भधारणा टिकवण्यासाठी मदत करते.

2. LIT थेरपी IVF शिवाय घेता येते का?

– होय, काही वेळा नैसर्गिक गर्भधारणेसाठीसुद्धा डॉक्टर ही थेरपी सुचवू शकतात.

3. ही थेरपी वेदनादायक असते का?

– नाही, LIT थेरपी एक साधी इंजेक्शन-आधारित प्रक्रिया आहे जी सहसा वेदनारहित असते.

4. LIT थेरपीचे साइड इफेक्ट्स होतात का?

– बहुतांश वेळा नाही, पण क्वचितच सौम्य सूज किंवा लालसरपणा होऊ शकतो.

5. ही थेरपी सर्व कपल्ससाठी योग्य असते का?

– नाही, ती फक्त इम्यून कारणांमुळे गर्भधारणा न टिकणाऱ्या कपल्ससाठीच सर्वात प्रभावी ठरते.

~ Verified by Progenesis Fertility Center's Expert Doctors

Your Dream of Parenthood Starts Here — Let’s Take the First Step Together and Turn Hope into a Beautiful Reality.

Loading...
IVF मधील LIT थेरपी – प्रक्रिया, फायदे आणि परिणाम